बरड येथील मुक्कामानंतर आज श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुतेकडे मार्गस्थ


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । फलटण ।  फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम म्हणजेच बरड येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा सोलापूर जिल्ह्यातील नातेपुतेकडे मार्गस्थ झाला आहे. काल बरड येथे पालखी सोहळा गावाच्या हद्दीत पोहचल्यावर ग्रामपंचायत बरड, विविध संस्था तसेच राजे गटातर्फे युवा नेते शेखर काशिद यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
आज पहाटे संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी (देवाची) चे मुख्य विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते अभिषेक झाला. तद्नंतर पालखीचे दोन्ही अश्वांनी दर्शन घेतले व पालखी सोहळा नातेपुते कडे मार्गस्थ झाला.

Back to top button
Don`t copy text!