अनिल देशमुख-खडसेंच्या भेटीनंतर पुन्हा चर्चेला उधाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, जळगाव, दि.१७: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची शनिवारी भेट झाली. रावेरच्या शासकीय विश्रामगृहात ही भेट पार पडली. त्यावेळी शासकीय विश्रामगृहाबाहेर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. आता देशमुख आणि खडसे भेटीतून काही नवे घडणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शासकीय विश्रामगृहातून हे दोन्ही नेते रावेर हत्याप्रकरणातील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी रवाना झाले. काही दिवसांपूर्वी घडलेल्या रावेर हत्याप्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख जातीने रावेरमध्ये आले होते.

योग्य वेळ येईल, वाट बघा : खडसे


भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घटनस्थापनेला प्रवेश करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होऊ शकला नाही. त्यातच खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच ‘योग्य वेळ येईल. वाट पाहा’, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!