पासवान यांच्या निधनानंतर सरकारमध्ये NDA च्या सहयोगी पक्षांमध्ये केवळ आरपीआय राहिले


 

स्थैर्य, दि.१०: रामविलास पासवान यांच्या निधनानंतर मोदी सरकारमध्ये भाजपव्यतिरिक्त NDA युतीमध्ये केवळ रामदास आठवले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) राहिले आहेत. तर केंद्रीय कॅबिनेटमध्ये तर भाजपच्या बाहेरचे कुणीही नाही, कारण आठवलेही राज्यमंत्री (मिनिस्टर ऑफ स्टेट) आहेत. त्याच्याजवळ सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री ही जबाबदारी आहे.

मोदी सरकारच्या दूसऱ्या कार्यकाळात केंद्रीय कॅबिनेटमध्ये सुरुवातीला NDA युतीमधून शिवसेनेचे अरविंद सावंत, शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल आणि लोकजनशक्ति पार्टीचे रामविलास पासवान होते.

JDU केंद्र सरकारमध्ये सामिल नाही, मात्र समर्थन आहे

शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत NDA चा राजीनामा दिला होता. अकाली दलाने गेल्या महिन्यात शेतकरी बिलाच्या विरोधात सरकारची साथ सोडली होती. यापूर्वी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी मोदी कॅबिनेटमध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्टरचे पद सोडले होते. नीतीश कुमारचा पक्ष JDU का कोणताही सदस्य मोदी कॅबिनेटमध्ये नाही, मात्र NDA चा भाग असल्याच्या नात्याने सरकारला समर्थन जारी ठेवले आहे.

मोदी कॅबिनेटमध्ये 24 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, आता 21 राहिले

गेल्यावर्षी 30 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींव्यतिरिक्त 57 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. यामध्ये 24 कॅबिनेट मिनिस्टर, 9 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 24 राज्यमंत्री सामिल होते. अरविंद सावंत, हरसिमरत कौर बादल यांचा राजानामा आमइ रामविलास पासवान यांच्या निधनानंतर आता 21 कॅबिनेट राहिले आहेत. रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर राज्यमंत्र्यांची संख्या कमी होऊन 24 वरुन 23 वर आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!