स्थैर्य, फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक जगन्नाथ ऊर्फ भाऊ कापसे यांना काही दिवसापूर्वी कोरोना या आजाराची लागण झालेली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलेले होते. काल (दि.५ ऑगस्ट) रोजी भाऊ कापसे यांनी या आजारावर यशस्वीरीत्या लढत देऊन ते फलटणमध्ये दाखल झालेले आहेत. फलटणमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी फलटणचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री काळभैरवनाथाच्या मंदिरा मध्ये दर्शन घेऊन आरती केली.
या काळामध्ये महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकराव चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे कुटुंबातील सर्वांनीच माझी व माझ्या कुटुंबीयांची कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे काळजी घेतली, त्याबद्दल मनापासून आभारी असल्याची भावना यावेळी भाऊ कापसे यांनी व्यक्त केली.
भाऊ कापसे यांचा कोरोनाचा बाबतचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या निकटच्या सहवासातील सर्वांचे तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर सुमारे आठ जणांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चेकिंग नंतर कळाले. यामध्ये भाऊ कापसे यांच्या पत्नी व फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ.प्रगती कापसे यांचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, परंतु पॉझिटिव्ह आलेल्या सर्वच्या सर्व जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात करून आता सर्वच्या सर्वजण गृह विलीगीकरणात आहेत व त्यातील काही जणांचा गृह विलीगीकरणाचा कालावधी येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होत आहे. याबरोबरच जे पॉझिटिव्ह आलेले होते. त्या आठ जणांच्या निकट संपर्कातील एकत्रित मिळून सुमारे ४० जणांचे SWAB तपासणीसाठी पाठवलेले होते. परंतु त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले व भाऊ कापसे यांच्यासह एकूण फक्त सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
कोणतीही भीती न बाळगता कोरोनाशी दोन हात करणे आवश्यक असून कोरोना बाबतचा आपल्या मनातील संभ्रम काढून टाकणे ही महत्त्वाचे आहे. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कृष्णा हॉस्पिटल, कराडचे सर्वेसर्वा डॉ.सुरेश भोसले, अतुल (बाबा) भोसले, विनायक (बाबा) भोसले यांच्याशी सतत संपर्क ठेवून विशेष काळजी घेण्यास सांगितले होते. याबद्दल त्यांचे व रुग्णालयात कोरोनावर ग्राउंड लेव्हलला काम करणारे डॉक्टर्स व सर्व कर्मचाऱ्यां बरोबर उपजिल्हा रुग्णालय, फलटण, फलटण नगरपरिषद, फलटण, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण, आरोग्य मंडळ (लाईफ लाईन हॉस्पिटल), फलटण यांचेही विशेष सहकार्य भाऊ कापसे यांना लाभले होते.