मिष्टी मुखर्जीच्या निधनानंतर लोकांनी मिष्टी चक्रवर्तीला वाहिली श्रद्धांजली


 

स्थैर्य, दि.५: हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री मिष्टी मुखर्जी हिचे अलीकडेच किडनी निकामी झाल्यामुळे निधन झाले. परंतु नावातील साम्यामुळे सोशल मीडियावर बर्‍याच लोकांनी तिच्याऐवजी अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर मिष्टी चक्रवर्ती हिने आप जिवंत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

मिष्टी चक्रवर्तीने रविवारी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘काही माध्यमांच्या वृत्तानुसार माझे आज निधन झाले. पण देवाच्या कृपेने, मी निरोगी आहे आणि अजून मला खूप पुढे जायचे आहे. # चुकीची बातमी.’ या पोस्टसह तिने फेक न्यूजचा एक स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे, ज्यामध्ये गुगलवर मिष्टी मुखर्जी डेथ सर्च केल्यावर तिच्या निधनाची माहिती समोर येतेय.

सुभाष घई यांच्या ‘कांची’ चित्रपटाद्वारे केले होते बॉलिवूडमध्ये पदार्पण


दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘कांची’ चित्रपटाद्वारे मिष्टी चक्रवर्ती हिने 2014 मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर, ती ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ (2016), ‘बेगमजान’ (2017) आणि ‘मणिकर्णिका’ (2019) या चित्रपटांमध्ये झळकली.

शुक्रवारी रात्री झाले मिष्टी मुखर्जीचे निधन


हिंदी आणि बंगली चित्रपटांमध्ये काम केलेल्या मिष्टी मुखर्जीचे 2 ऑक्टोबरच्या रात्री दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे निधन झाले. रिपोर्ट्सनुसार, कीटो डाएट घेतल्यामुळे तिची तब्येत ढासळली होती. ती अवघ्या 27 वर्षांची होती. निधनानंतर शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!