बाणगंगा नदी पाठोपाठ आता नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


दैनिक स्थैर्य | दि. 25 मे 2025 | फलटण | मागील चार ते पाच दिवसापासून नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे.

यामुळे वीर धरणाच्या खालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे सद्यस्थितीत नीरा नदी पात्रात अंदाजित ३० हजार क्यूसेस इतका विसर्ग वाहत आहे.

तसेच नीरा नदी पात्रातील बंधाऱ्यांमध्ये आधीपासून पाणीसाठा आहे. नीरा नदी पात्रातील पुराच्या पाण्यास अडथळा होऊ नये म्हणून बंधाऱ्यांचे वरील बर्गे काढण्याचे काम पाटबंधारे विभागाकडून हाती घेण्यात आलेले आहे. पावसाचा जोर वाढत गेल्यास नीरा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे नीरा नदीच्या पात्रातील बंधाऱ्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे.

तरी नीरा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे; अशी माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!