तब्बल 20 वर्षानंतर मुधोजी हायस्कूलमध्ये जमला सवंगड्यांचा मेळा


दैनिक स्थैर्य । 2 जून 2025। फलटण । येथील मुधोजी हायस्कूलमध्ये 2005 मधील दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात झाले. या संमेलनात 40 माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. तब्बल 20 वर्षानंतर मुधोजी हायस्कूलमध्ये सवंगड्यांचा मेळा जमला. यावेळी सर्व माजी विद्यार्थी एकत्रित आले.

स्नेहसंमेलनास माजी प्राचार्य आवटे, एस. टी. रणनवरे, जोशी मॅडम, डी. टी. नाळे यांचे या विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे योगदान आहे. या स्नेहसंमेलनाचे सकाळी 11 वाजता सुरू झाला. प्राचार्य आवटे मॅडम व माजी शिक्षकांनी ही मनोगत व्यक्त केले.

या संमेलनाकरिता खास पुणे, मुंबई तसेच दुबई व अमेरिकेमधून विद्यार्थी उपस्थित राहिले. या बॅचमधील माजी विद्यार्थिंनी सायली नलवडे कविटकर हिने 2019 आणि 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय नेत्यांसाठी व पक्षासाठी काम केले. तिच्या सहा वर्षाच्या कामाची दखल घेत तिचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील पॉलिटिकल कॅम्पेनिंग फॅर्म चालवणारी एकमेव महिला म्हणून ओळख मिळाली. तिने विश्लेषण वाईफ हे यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. ही मुधोजी हायस्कूलची विद्यार्थिनी असल्याचा अभिमान असल्याचे मत असे सागर दोशी यांनी व्यक्त केले. तिचा प्राचार्य आवटे मॅडम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

या बॅचमधील विद्यार्थी व विद्यार्थिनी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. या संमेलनाकरिता सागर दोशी, श्रीनिवास भुजबळ, अक्षय झोरे, अजिंक्य कदम, प्रभंजन कापसे, सुप्रिया काटे यांनी परिश्रम घेतले. या स्नेहसंमेलनात सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचा झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांकडून मुधोजी हायस्कूलला झाडांची रोपे व कुंड्या भेट देण्यात आल्या.


Back to top button
Don`t copy text!