निरा-देवघर व कृष्णा-भीमा स्थिरीकरणाची हवाई पाहणी करावी; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना विनती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० फेब्रुवारी २०२३ | फलटण | निरा-देवघर व कृष्णा-भीमा स्तरीकरण याची हवाई पाहणी केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी करावी, अशी विनंती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांची दिल्लीत भेट घेऊन केली आहे.

दिल्ली येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली व नुकत्याच महाराष्ट्र सरकारने निरा-देवघर या प्रकल्पाला मंजुरी देऊन निधीची तरतूद केलेली आहे व प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. केंद्र सरकारने निरा-देवघरसाठी निधी द्यावा व आपण प्रत्यक्ष या प्रकल्पाची हवाई पाहणी करावी, जेणेकरून या दुष्काळी भागाचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपणार आहे.

तसेच महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाचा असणारा कृष्णा-भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प कृष्णा लवादाच्या अंतर्गत काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेला आहे. यावरही केंद्रीय मंत्री यांनी मार्ग काढावा व याचीही आपण हवाई पाहणी करून पश्चिम महाराष्ट्राबरोबरच मराठवाड्याला फायद्याचा असणारा दुष्काळी भागाचा हा प्रकल्प मार्गी लावावा. यामुळे दुष्काळी भागाला पाणी मिळून हा संपूर्ण परिसर ओलिताखाली येईल, अशी विनंती खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय जलसंपदामंत्री शेखावत यांना केली आहे.


Back to top button
Don`t copy text!