
दैनिक स्थैर्य | दि. ५ जुलै २०२३ | फलटण |
फलटण तालुका वकील संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत संघाच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट अजित चांद पठाण यांची, तर उपाध्यक्षपदी म्हणून अॅडव्होकेट रामचंद्र पोपट घोरपडे यांची निवड झाली आहे.
फलटण वकील संघाच्या कार्यकारिणीत सचिवपदी अॅडव्होकेट अमोल सस्ते, सहसचिव अॅडव्होकेट अर्जुन कोळेकर, खजिनदारपदी अॅडव्होकेट शितल सोनवणे, सदस्यपदी अॅडव्होकेट आशा काकडे, अॅडव्होकेट कोमल जाधव अशी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सर्वांचे विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट आर. वाय. कदम यांनी काम पाहिले. निवडणूक निर्णय अधिकारी सदस्य म्हणून अॅडव्होकेट डी. एस. टाळकुटे, अॅडव्होकेट व्ही. बी. ढालपे यांनी काम पाहिले.
 
					 
					 
					 
					
 
					 
					 
					 
					 
					 
					