दैनिक स्थैर्य । दि. २३ जून २०२३ । मुंबई । फिजिक्सवाला (पीडब्ल्यू) या भारतातील शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात लोकशाहीकरण करणाऱ्या आघाडीच्या एड-टेक व्यासपीठाने जेईई ॲडवान्स्ड रिझल्ट्स २०२३ मध्ये उल्लेखनीय यश संपादित केले आहे. तसेच, पीडब्ल्यूच्या बॅचेसमधील ३५०० हून अधिक विद्यार्थी उत्तम गुणांसह जेईई अॅडवान्स्ड २०२३ मध्ये पात्र ठरले. फिजिक्स वालाने जेईई अडवान्स्डच्या गेल्या वर्षाच्या निकालांच्या तुलनेत सेलेक्शन रेशिओमध्ये ६७ टक्के वाढ पाहिली आहे.
फिजिक्स वालाचे अव्वल गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत अपूर्व समोटा एअर-९२, मोहम्मद साहिल अख्तर एअर-९९, शिवम सिंग यादव एअर-१५१, श्लोक एन. जैन एअर-१७७, अनुभव साहा एअर-३९८ आणि सुचीर कालरा एअर-५०७.
यंदा पीडब्ल्यू शिक्षकवर्गाने प्रशिक्षित केलेले विद्यार्थी उत्तम गुणांसह परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि अव्वल टेक्निकल कॉलेजमध्ये प्रवेश सुनिश्चित केला. पीडब्ल्यूच्या १० हून अधिक विद्यार्थ्यांनी एअर ५०० अंतर्गत रँक मिळवला, तर पीडब्ल्यूच्या ३० हून अधिक विद्यार्थ्यांनी एअर १००० अंतर्गत रँक मिळवला आणि पीडब्ल्यूच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी एअर २००० अंतर्गत रँक मिळवला.
फिजिक्स वालाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अलख पांडे म्हणाले, ‘‘आम्हाला जेईई ॲडवान्स्ड २०२३ परीक्षेत आमच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या उल्लेखनीय यशाचा अत्यंत अभिमान वाटतो. पीडब्ल्यूमध्ये आम्ही यापूर्वी आर्थिक किंवा लॉजिस्टिकल अडथळ्यांचा सामना केलेल्या विद्यार्थ्यांसाठी यशस्वीपणे संधीचे दरवाजे खुले केले आहेत. आमच्या जेईई ॲडवान्स्ड बॅचेसनी संपादित केलेल्या अपवादात्मक निकालांमधून आमच्या शैक्षणिक दृष्टिकोनाची परिणामकारकता दिसून येते, जो अर्थपूर्ण अध्ययन अनुभव निर्माण करण्याला प्राधान्य देतो. कंपनी म्हणून आम्ही उल्लेखनीय अध्ययन निष्पत्ती वितरित करण्याप्रती, तसेच आमच्या कन्टेन्ट वितरण मॉडेलमध्ये सतत नाविन्यता आणण्याप्रती आणि आमच्या विद्यार्थ्यांना सर्व परीक्षा तयारी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश संपादित करण्यास सक्षम करण्याप्रती कटिबद्ध आहोत.’’