प्रगत शिक्षण संस्था फलटण चे शैक्षणिक गुणवत्तेसाठी औसा तालुक्यात अंगणवाड्या सोबत निपुण भारत अंतर्गत कामसुरू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२२ । फलटण । प्रगत शिक्षण संस्था फलटण, पंचायत समिती औसा तालुका – औसा जिल्हा – लातूर (एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प) व एच टी पारेख फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या ‘शैक्षणिक अखंडतेसाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक शिक्षणातील पूल’ या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्यातील २५ व माण तालुक्यातील 50 अंगणवाड्यांसोबत केंद्र शासनाच्या निपुण भारत या अभियाना अंतर्गत भाषा व गणित या विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान ही कौशल्य आत्मसात करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रगत शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ.मंजिरी निंबकर, प्रकल्प समन्वयक प्रकाश अनभुले च्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका व मदतनीस त्यांना प्रशिक्षण देण्यात येत तसेच प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहाय्यकांच्या व प्रकल्प अधिकाऱ्यांच्या नियमित अंगणवाडी भेटी सुरू आहेत.

नुकतीच या प्रकल्पांतर्गत औसा तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी किशोर लक्ष्मण गोरे यांनी करजगाव येथील अंगणवाडी ला भेट दिली. या भेटीमध्ये प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रात्यक्षिकासह त्यांनी माहिती घेतली. सेविका व मदतनीस यांच्याशी चर्चा केली. विद्यार्थ्यांमधील शैक्षणिक कौशल्य विकास पाहिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अंगणवाडी परिसरामध्ये वृक्षारोपण ही करण्यात आले. करजगावचे सरपंच श्रीधर जाधव, ग्रामसेवक बसरगे, प्रकल्प अधिकारी मिलिंद अहिवळे, प्रकल्प सहाय्यक मुक्ता बनसोडे, अंगणवाडी सेविका आशा दिलीप दळवे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!