स्थैर्य, सातारा, दि.२०: सातारा जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती व ढाकणी गावचे सुपुत्र अॅड.शंकरराव शिंदे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.
अॅड.शंकरराव शिंदे हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. माजी सहकार मंत्री स्व.विलासराव पाटील-उंडाळकर यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यांच्या निधनाने ढाकणी गावासह काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, कन्या, पुतणे असा परिवार आहे.