
दैनिक स्थैर्य । 5 ऑगस्ट 2025 । सातारा । येथील प्रसिद्धलेखिका, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्या व ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सीमंतिनी नूलकर यांची मॉरिशियस-महाराष्ट्र फाउंडेशनच्या (माफ फाउंडेशन) या संस्थेच्या संचालकपदी निवड झाली आहे.
मॉरिशियस देशात गेल्या 150 वर्षांपासून महाराष्ट्रातील बांधव राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन आदी व्यवसायात कार्यरत आहेत. ही माफ फाउंडेशन संस्था शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योग आदानप्रदान मार्गदर्शन व विविध उपक्रमांत कार्यरत आहेत. मॉरिशियसचे पर्यटन व सांस्कृतिकमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सांस्कृतिकमंत्री हे या फाउंडेशनचे पदसिद्ध पालक आहेत. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ व मॉरिशियसच्या टेलिव्हिजनचे माजी कार्यक्रम सल्लागार योगेश्वर गंधे (आयआयएस) हे फाउंडेशनचे भारतातील प्रमुख आहेत. भारतातून अभिनेत्री वंदना सरदेसाई व अॅड. सीमंतिनी नूलकर यांची निवड करण्यात आली आहे.