फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. सागर सस्ते

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण वकील संघाची सन २०२२ ते २०२३ या कालावधीसाठी अध्यक्ष पदाची व सचिव पदाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये अध्यक्षपदी ॲड. सागर सस्ते हे २७ मतांनी विजयी झाले.

सन २०२२ ते २०२३ या कालावधीसाठी फलटण वकील संघाच्या अध्यक्ष व सचिव पदासाठीची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. त्यामध्ये ॲड. सागर सस्ते यांना ११९ मते मिळाली तर ॲड. अभिजीत दत्तात्रय यादव यांना ९२ मते मिळाली. ॲड. सागर सस्ते हे २७ मतांनी विजयी झाले. वकील संघाच्या निवडणुकीत ॲड. सुजाता माने – प्रधान यांनी ॲड. सागर सस्ते यांना पाठिंबा दिलेला होता.

वकील संघाच्या सचिव पदासाठी ॲड. धनराज दशरथ कदम हे ३३ मतांनी विजयी झाले. त्यामध्ये ॲड. धनराज दशरथ कदम यांना १२१ तर ॲड. अमोल बबनराव सस्ते यांना ८८ मते मिळाली.

फलटण वकील संघातील वकिलांनी जो विश्वास ठेवुन मतदान केलेले आहे. त्याला तडा जावू देणार नाही. त्यासोबतच फलटण येथे लवकरात लवकर अतिरिक्त सत्र न्यायालयासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे ॲड. सागर सस्ते यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ॲड. सागर सस्ते यांची फलटण वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिकसह विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!