
दैनिक स्थैर्य । 20 मार्च 2025। फलटण । सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मलठण येथील श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल येथे मुली व महिलांच्या समवेत रंगपंचमी खेळण्याचा आनंद लुटला.
यावेळी युवा नेत्या सौ. मनिषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची उपस्थिती होती.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणामध्ये फलटण शहरातील अनेक मुली व महिला भगिनींनी रंगपंचमीच्या रंगोत्सवमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.