अ‍ॅड. डॉ. ए. के. शिंदे यांना वनश्री पुरस्कार जाहीर


दैनिक स्थैर्य । 22 मार्च 2025। फलटण । येथील मुधोजी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी अ‍ॅड. डॉ. अशोक कृष्णा शिंदे यांना वन विभागाच्यावतीने सातारा परिक्षेत्रचा वन्यजीव संवर्धन व निसर्ग संवर्धनामध्ये करीत असलेल्या कार्याबाबत वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

येथील नवलबाई मंगल कार्यालयात जागतिक वन दिवसानिमित्त ‘वन वनवा परिसंवाद’ व ’पुरस्कार वितरण’ कार्यक्रमात उपवनसंरक्षक श्रीमती आदिती भारद्वाज यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी दिगंबर जाधव, प्राचार्य रवींद्र येवले, कवी हनुमंत चांदगुडे, हनुमंत सोनवलकर, हरिचंद्र वाघमोडे, कथाकथनकार रवींद्र कोकरे, सचिन रघततवाम, रानकवी व वनअधिकारी राहुल निकम उपस्थित होते.

हा पुरस्कार स्वीकारताना अ‍ॅड. डॉ.ए. के. शिंदे यांच्याबरोबर एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रम अधिकारी एस. एस. लवांडे, व एन. एस. एस. कमिटी सदस्य डॉ. वाय. आर. मठपती, प्रा. ललित वेळेकर, प्रा. किरण सोनवलकर, प्रा. रेश्मा निकम, एन. एस. एस. विभागाचे स्वयंसेवक व स्वयंसेविका यांच्यासह पोलीस पाटील, वन अधिकारी नागरिक उपस्थित होते.

याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळ चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्राचार्य अरविंद निकम, प्राचार्य. प्रो.डॉ. पी. एच. कदम, प्राध्यापक, पदाधिकारी, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!