शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक – प्रा.अरविंदकुमार सक्सेना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ जानेवारी २०२३ । नागपूर । मृदा संवर्धन आणि प्रदूषण इ. अशा समस्यांवर मात करण्यासाठी नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता सध्याच्या आणि वाढत्या जागतिक लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रा.अरविंद कुमार सक्सेना यांनी केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसच्या चौथ्या दिवशी ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राचे अध्यक्षपदावरुन प्रा. अरविंदकुमार सक्सेना बोलत होते.

या सत्रात डॉ. ए.के. सिंग, नोएडा यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, भारत ही सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. जैवतंत्रज्ञान हे आधुनिक, हरित आणि शाश्वत अर्थव्यवस्थेचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे.  बायोइकॉनोमी चे स्वरूप हे कचरा व्यवस्थापन, शेती, ब्लू बायो-इकॉनॉमी, वन जैव अर्थव्यवस्था, ऊर्जा, कृत्रिम अवयव, पर्यावरण,आरोग्य आणि पोषण, जैव सुरक्षा, उच्च-कार्यक्षमता बायोमटेरियल, कापड इत्यादी क्षेत्रात दिसून येते. कोविड लसीचे यश हे भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्राच्या ताकदीचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे. वाढत्या स्टार्ट-अप्सची संख्या, हे ऑपरेशन सुरू करणारे नवीन उद्योग एक पाऊल आहे, असेही डॉ. सिंग यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!