विकासकामांच्या मार्केटिंगमध्ये राजे गट कमी पडल्याची कबुली!; कार्यकर्त्यांच्या संवाद मेळावा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २९ नोव्हेंबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगांव विधानसभा निवडणूकीत सत्ताअबाधित ठेवण्यात अपयशी ठरल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज अनंत मंगल कार्यालयात राजे गटाचा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा पार पडला. विकासकामांच्या मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलो असल्याची कबुली या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांनी बोलून दाखवली असल्याचे समजत आहे.

मेळाव्यादरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी, ‘‘आपण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली; पण ती लोकांमध्ये पोचवण्यात कमी पडलो’’, असे कबुल केले असल्याची चर्चा पहायला मिळाली. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, ‘‘आपण केलेली विकासकामे मतदारांपर्यंत पोचवण्यात कमी पडलो’’, असे सांगत ‘‘सरकारची लाडकी बहीण योजना, शेतकरी वीज बील माफी याचासुद्धा फटका आपल्याला बसला’’, असल्याचे स्पष्ट केले तर माजी आमदार दीपक चव्हाण यांनीही आपण केलेली कामे लोकांच्या निदर्शनास आणून देण्यात कमी पडलो हे सांगताना, ‘‘आपण विकासकामांच डोंगर उभा केला परंतु त्याचे मार्केटिंग करण्यात आपण अयशस्वी झालो’’, असे सांगितले असल्याचे समजत आहे.


Back to top button
Don`t copy text!