दैनिक स्थैर्य । दि. १६ जुलै २०२१ । मुंबई । परदेशात उच्च शिक्षण मिळविण्यात सुलभता आणण्याचे काम करणाऱ्या एका एडटेक या अॅडमिटकार्ड (AdmitKard)द्वारे पूर्व-मालिका अ फेरीमध्ये १० कोटी रुपये उभारले आहे. ही फेरी ज्यांनी स्वतः प्रत्यक्ष भाग घेतला आहे, अशा मुख्यत: केवळ एडटेक प्लॅटफॉर्मच्या संस्थापकांनी सुरु केली आहे. या फेरीमध्ये, वेदांतूचे वाम्शी कृष्णा आणि पुलकित जैन, अपग्रॅडचे मयंक कुमार, अनअॅकॅडमीचे गौरव मुंजाल, रोमन सैनी आणि सुमित जैन, डाउटनटच्या तनुश्री नागोरी, आदित्य शंकर आणि रवी शेखर, अवंतीचे अक्षय सक्सेना आणि पंकज चड्डा (माजी झोमाटो), भारतपेचे सुहेल समीर आणि ध्रुव धनराज बहल, विजय एरिसेट्टी (मायगेट), आनंद चंद्रशेखरन (माजी स्नॅपडील, फेसबुक), मोर्फियसचे समीर गुगलानी, बीसीजी पार्टनर्स, जेपीमॉर्गनचे एमडी आणि इतर या सारख्या प्रसिध्द एडटेक स्टार्टअपच्या संस्थापकांनी भाग घेतला.
या साथीच्या रोगाने स्टार्ट-अप उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान घडवून आणले, तथापि, एडटेक हे, या कठीण कालावधीमध्ये वाढीची नोंद करणाऱ्या क्षेत्रांपैकी एक क्षेत्र राहिले आहे. सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणार्या या क्षेत्राद्वारे, या निधी उभारण्याच्या कार्यामध्ये एक परस्पर फायदेशीर दृष्टिकोन दर्शविला आहे, जेथे एडटेकचे संस्थापक अॅडमिटकार्डद्वारे निधी गोळा करण्यासाठी पुढे आले आहेत.
अॅडमिटकार्डचे सह-संस्थापक श्री. रचित अग्रवाल म्हणाले, “या साथीच्या रोगाच्या दरम्यान, आमच्या लक्षात आले की बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमांमुळे विद्यार्थी परदेशात जाऊ शकले नाहीत. म्हणूनच, विद्यार्थ्यांना आमच्या दीर्घकाळ चाललेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात चांगला अनुभव मिळवून देण्यासाठी आम्ही दुप्पट प्रयत्नांसह काम केले. जेणेकरून मानवांवर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांच्या गराजांसाठीचे मार्गदर्शन हे, उत्पादन-प्रेरित असेल या बाबीची पूर्तता केली जाऊ शकेल. आम्ही इतर एडटेकच्या अनुभवी सल्लागारांकडून मार्गदर्शन प्राप्त केले आणि संपूर्ण समुपदेशन प्रक्रियेस कौशल्य रहित केले, जेणेकरून या उद्योगातील समुपदेशकांची एक मोठी समस्या सोडवली गेली.”