
दैनिक स्थैर्य । फलटण । श्री सद्गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. नर्सरी ते दहावीपर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश उपलब्ध असून, इच्छुक पालकांनी शाळेच्या कार्यालयात संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नाझनीन शेख यांनी केले आहे.
ब्रिलियंट अकॅडमी अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून, संपूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाते. प्रत्येक वर्ग डिजिटल असून, वर्गशिक्षक विद्यार्थ्यांना टॅबद्वारे शिक्षण देतात. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सीबीएससीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण दिले जाते. शासकीय तसेच विविध स्कॉलरशिप परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी केले जाते.
शाळेला आर.टी.ई.ची शासन मान्यता असून, दरवर्षी पहिलीच्या वर्गात आर.टी.ई. मार्फत विद्यार्थी प्रवेशित होतात. इतर नियमित विद्यार्थ्यांसाठी माफक शुल्क आकारणी केली जाते. शाळेत प्रशस्त इमारत, क्रीडांगण, अद्ययावत संगणक डिजिटल लॅब आणि विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लीड प्रणाली कार्यान्वित असून, पालकांना शुल्क भरण्यासाठी आणि पाल्याची प्रगती पाहण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एसएससी बोर्ड परीक्षेत दरवर्षी शंभर टक्के निकाल लागण्याची शाळेची परंपरा कायम आहे.
शाळेत प्रशिक्षित शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. दिलीपसिंह भोसले, संस्थेचे सचिव श्री. रणजीतसिंह भोसले आणि शाळेच्या प्रशासकीय संचालिका सौ. प्रियदर्शनी भोसले यांच्या नेतृत्वाखाली शाळा प्रगतीपथावर आहे.
शासन नियमानुसार शाळेची वेळ सकाळी ९ वाजता आहे. अधिक माहितीसाठी सौ. वर्षा हीरणवाळे (प्री-प्रायमरी विभाग प्रमुख) यांच्याशी ९०९०७१३०३० किंवा ७३८५२२४४११ या क्रमांकांवर संपर्क साधावा. टेलिफोन एक्स्चेंज समोर, स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथे पालकांनी भेट द्यावी.