दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२१ । सातारा । सामाजिक न्याय विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या मुलांचे शसकीय वसतिगृह खटाव जि. सातारा या वसतिगृहात अनुसूचित जाती या संवर्गातील सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षात विद्यालयीन विभागातील इ. 8 वी ते 10 वीत शिक्षण घेत असलेल्या 21 तर महाविद्यालयीन विभागात शिक्षण घेत असलेल्या 27 विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देणे सुरु आहे, अशी माहिती वसतिगृहाच्या अधीक्षकांनी दिली आहे.
यासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा महाराष्ट्र शासन मान्य शैक्षणिक संस्थेत असावा. प्रवेश मिळाल्यानंतर वसतिगृहात विनामुल्य भोजन व निवासाची सोय असून संस्था प्रमुखांच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याकरिता आवश्यक असलेली क्रमिक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, विद्यालयीन गणवेश व छत्री अथवा रेनकोट विनामुल्य पुरविण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना दरहमा रु. 500/-प्रमाणे निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो.
वसतिगृह प्रवेश अर्ज कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते 5 या वेळत विनामुल्य मिळतील. तरी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी मुलांचे शासकीय वसतिगृह खटाव जि. सातारा येथे संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल मुलांचे शासकीय वसतिगृह खटाव यांनी केले आहे.