दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | सातारा |
सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सहावी व नववी इयत्तेत प्रवेश घेण्यासाठी सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे, अशी माहिती सातारा सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन के. श्रीनिवासन यांनी दिली.
प्रवेश परिक्षेचे अर्ज दि. २४ डिसेंबरपासून भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुला-मुलींना सुवर्णसंधी असून याकरीता विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२५ पर्यंत १० ते १२ वर्ष असावे, तर इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२५ पर्यंत १३ ते १५ वर्षे यादरम्यान असावे.
सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत १३ जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे अत्यंत जरुरीचे आहे.
प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी हीींिीं://शुराी.पींर.रल.ळप/अखडडएए या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही प्राचार्य के. श्रीनिवासन यांनी केले आहे.