दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील सोनगाव येथील किरण निकाळजे, वडले येथील समर्थ मोरे, देविदास मोरे व तरडफ येथील अजय मोरे, बाळू माने यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
वंचित बहुजन आघाडीच्या फलटण येथील कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास फलटण तालुका माजी उपाध्यक्ष अमित गायकवाड, विकास मोरे, संघटक विजय कांबळे, रोहित गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.