प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने विकासकामे पूर्ण करावी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । मुंबई । श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्यातील विकासकामे प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिले.

आराखड्यातील विकासकामांच्या प्रगतीबाबत श्री.सामंत यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्रालयात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्यासह इतर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.सामंत म्हणाले, श्री क्षेत्र गणपतीपुळे विकास आराखड्याला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आराखड्यातील विविध कामे प्रलंबित आहे. विकासकामे तातडीने पूर्ण करावीत. विकासकामांना पूर्णत्वास नेण्याची प्रत्येकाची सांघिक जबाबदारी आहे. जनतेला पायाभूत सुविधा पुरविणे ही नैतिक जबाबदारी ओळखून प्रशासनाने काम करावे. येत्या जानेवारीपर्यंत विकास आराखड्यातील सर्व पायाभूत सुविधांची कामे, शैक्षणिक क्षेत्रातील कामे, पाणीपुरवठा, नळपाणी योजना, रस्ते विकास आणि व्यापारी संकुलाविषयी प्रलंबित कामांची प्रक्रिया राबवून प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही श्री.सामंत यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!