काल धरणाच्या १०२ कोटीच्या जलवाहिनी प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी – खासदार उदयनराजे भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२२ । सातारा । कास धरण ते पावर हाऊस या अखेर अतिरिक्त गुरुत्वनलिका टाकण्याच्या 102 कोटी 56 लाख रुपयांच्या विकास कामाला केंद्र शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे केंद्र शासनाच्या अमृत दोन योजनेअंतर्गत या प्रकल्पाला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार द्वारे दिली आहे.

पत्रकात नमूद आहे की सातारा नगरपरिषदेच्या मालकीच्या कास धरणाची उंची वाढवण्यात आली आहे उंची वाढवल्यामुळे धरणामध्ये 502 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आता होणार आहे . साताऱ्याकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा दाब वाढला आहे त्यामुळेच त्या पाण्याचा प्रवाह समावेशित होईल अशा प्रमाणित व्यासाच्या पाईपलाईन बसवणे गरजेचे झाले आहे . त्यामुळे आणखी एक पाईपलाईन कास धरणापासून टाकण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला अमृत योजनेअंतर्गत सादर करण्यात आला होता कास धरण ते पावर हाऊस या 27 किलोमीटरच्या अतिरिक्त पाईपलाईन योजनेला तसेच 16 एम एल डी क्षमतेचा फिल्टर प्लांट व दहा लाख लिटर क्षमतेची पावर हाऊस येथे नवीन पाण्याची टाकी 10 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प इत्यादी कामे या प्रकल्पामध्ये होणार आहेत.

डी आय आणि एम एस पाईपलाईन या कामासाठी वापरण्यात येणार असून साडेपाचशे एमएम व्यासाची पाईपलाईन आहे आजही धरणातून पाईपलाईन मधून कोणताही खर्च न येता 9 एम एल डी शुद्ध पाणी सातारकरांना उपलब्ध होत आहे नव्या पाईपलाईन द्वारे ४४ एमएलडी स्वच्छ पाणी सातारकरांना लवकरच उपलब्ध होणार आहे या कामासाठी केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून 102 कोटी 55 लाख खर्च करण्यात येणार आहे पैकी केंद्रशासन 34 कोटी रुपये राज्य शासन 53 कोटी रुपये देणार आहे तर 15 कोटी रुपये लोक वर्गणी ही सातारा नगरपालिकेची असणार आहेत अमृत योजनेच्या केंद्रीय शिखर समितीची मंजुरी या कामाला मिळाली असून लवकरच याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यानंतर अतिरिक्त पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे या कामा ंसाठी केंद्रीय जल मंत्री हरदीप सिंह पुरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांचे सहकार्य लाभल्याचे उदयनराजे भोसले यांनी आवर्जून नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!