
दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२२ । लोणंद । लोणंद शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २८ जुन रोजी मुक्कामी येत असून पालखीतळावर व लोणंद शहरात खोकी धारकांनी केलेले अतिक्रमण खंडाळा तहसिलदार दशरथ काळे यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले.
सोमवारी दुपारी २ वाजता अतिक्रमण मोहीमेला रेस्ट हाऊस येथून सुरुवात करून ही अतिक्रमण मोहीम नगरपंचायत लक्ष्मी रोड तानाजी चौक येथे येताच तेथे जुना सरकारी टीव्ही असणारी रुम पाडण्यात आली व रस्त्यात मध्ये असाणारी खोकी हलवण्यात आली गांधी चौक मार्गे बाजार तळ येथे करण्यात यावेळी पालखी तळावर असणारी अनेक खोकी जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात आली तसेच पालखी तळ येथे लिंबाचे झाड ही अतिक्रमणात जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आले यात अनेक खोकी धारकांचे नुकसान झाले आहे. अधिकारी व खोकी धारक यांच्यात शाब्दिक चकमकी होत होत्या. अनेक खोकीधारक माझे काढलय तर ते पुढचे पण लगेच काढा म्हणत असल्याने पालखीतळ येथे अनेक खोकीधारकांचे नुकसान झाले आहे. पालखीतळ येथील अनेक खोकीधारक पक्के बांधकाम देखील पाहा अशी तहसिलदार यांना विनंती करत होते. ही अतिक्रमण मोहिम रात्री साडेसात वाजेपर्यत बाजार तळ येथे चालु होती. राहिलेली अतिक्रमणे मंगळवारी सकाळी काढण्यात येणार आहेत.
यावेळी खंडाळा तहसिलदार दशरथ काळे सार्वजनिक बांधकाम अभियंता पीडी. मस्तुद , आशिष कर्वे, नगरपंचायात मुख्याधिकारी संजय गायकवाड , सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर ,नगरपंचायत अभियंता सागर मोटे तसेच नगरपंचायतचे व पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.