दैनिक स्थैर्य । दि. २६ सप्टेंबर २०२२ । फलटण । डेंग्यु आणि चिकनगुनिया रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी केले आहे.
यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा, पाण्याची भांडी आठवड्यातून एक दिवस घासून कोरडी करण्यात यावीत, पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण लावावे, डासांची पैदास होणारी ठिकाणे व भंगार साहित्याची विल्हेवाट वेळच्यावेळी लावण्यात यावी. फिकट रंगाचे आणि लांब बाह्यांचे कपडे घालावेत. डेंग्यु व चिकनगुनिया रुग्णांची संपूर्ण माहिती नागरी आरोग्य केंद्रास तात्काळ देण्यात यावी. याप्रमाणे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे ज्यांच्या घरी डेंग्युच्या अळ्या सापडतील त्यांच्यावर 500 रुपये इतकी दंडाची आकारणी करण्यात येईल, असे कळवण्यात आले आले आहे.