प्रशासन सतर्क : मरिआईचीवाडीत सापडल्या मृत कोंबड्या; नमुने तपासणीसाठी प्रयाेगशाळेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.१५ : खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी प्रतिबंध नियंत्रण अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील 10 किलाे मीटर त्रिज्येतील (Radius) क्षेत्र सतर्क भाग म्हणून आदेशान्वये जाहीर केला आहे.

या आदेशानुसार प्रभावित क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यसास मनाई करण्यात आली असून त्या ठिकाणची खासगी वाहने प्रभावित परिसराच्या बाहेर लावण्यात यावीत. प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मचे प्रवेशद्वार आणि परिसर दाेन टक्के सोडियम हायड्रोक्साई किंवा पोटॅशियम परमॅग्नेटने (दाेन टक्के) निर्जंतुकीकरण करावे.


Back to top button
Don`t copy text!