दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । ठाणे । ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणप्रकरणी आता उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे यांची तक्रार अद्याप नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गटाकडून उद्या ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा महामोर्चा आयोजित करण्यात आला असून आमदार आदित्य ठाकरे याचं नेतृत्व करणार आहेत. तसंच या मोर्चात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी राज्याचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी आणि आधित्य ठाकरे यांच्यासह रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यानंतर उद्धव ठाकरे ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात पोहोचले. पण ठाणे पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्तच उपस्थित नसल्यानं उद्धव ठाकरे यांची भेट होऊ शकली नाही. यामुळे ठाकरे गट चांगलाच संतापला आहे.
उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील विश्राम गृहातून पत्रकार परिषद घेत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. राज्यात जर महिला सुरक्षित नसतील तर उगाच फुकाच्या गोष्टी गृहमंत्र्यांनी करू नयेत आणि पदाचा राजीनामा द्यावा. तसंच पोलीस आयुक्तच जर कार्यालयात हजर राहत नसतील तर अशा निष्क्रीय अधिकाऱ्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्या महिला आघाडीचा महामोर्चा
रोशनी शिंदे मारहाणप्रकरणी अजूनही एफआयआर नोंदवून घेण्यात आलेली नसल्यानं ठाकरे गट संतापला असून उद्या महिला आघाडीच्या माध्यमातून महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. उद्या दुपारी तीन वाजता ठाण्यातील शिवाजी मैदानातून या मोर्चाला सुरुवात होणार असून ठाणे पोलीस आयुक्तालावर धडणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.