डोर्लेवाडी मध्ये बालकांना पौष्टिक खाऊ वाटप


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । बारामती । बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस बारामती तालुका उपाध्यक्षा रोहिणी खरसे-आटोळे यांच्या वतीने अंगणवाडी व परिसरातील बालकासाठी पौष्टिक खाऊ चे वाटप करण्यात आले या प्रसंगी आंगणवाडी प्रमुख यशोदा वाबळे, मीनाक्षी राऊत, श्रेया भोसले व,पालक, कर्मचारी उपस्तित होते. या वेळी उपस्तिती सर्वानी
खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून शुभेच्छा देण्यात आल्या.

बालकांचा शारीरिक विकास होण्यासाठी पौष्टीक आहार महत्वाचा असून मातांनी पौष्टीक आहार बाबत सतर्क राहिले पाहिजे असेही रोहिणी खरसे -आटोळे यांनी सांगितले.

या प्रसंगी मातांना गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला उप्स्तीतचे स्वागत सौ माया नेवसे यांनी केले तर आभार माई भोपळे यांनी केले


Back to top button
Don`t copy text!