दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२२ । बारामती । विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ व अभ्यास याचा समन्व्य साधून यश मिळवावे आणि आदित्य अकॅडमी ने गुणवत्ता व दर्जा राखला असे प्रतिपादन शरयु फौंडेशन च्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
सूर्यनगरी येथील आदित्य अकॅडमी च्या नवीन शाखा उदघाटन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ प्रसंगी मा. शर्मिला पवार बोलत होत्या या वेळी बारामती बॅंकचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष राहुल वाबळे बारामती दूध संघ चेअरमन संदीप जगताप, नगरसेवक,जयसिंग देशमुख,समीर चव्हाण संजय संघवी, नगरसेविका कमल कोकरे, संगीता सातव व प्रताप पागळे, किशोर मासाळ, संतोष सातव,माणिक मोकाशी, अजित दादा युथ फौंडेशन अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, उपाध्यक्ष दत्ता माने, शरयू फौंडेशन सदस्या अश्विनी करचे, ऍड रोहित काटे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मोबाईल चा कामापुरता वापर करावा, इंग्रजी भाषेवर प्रभूत्व मिळवावे, अभ्यासा बरोबर शारीरिक वाढ होण्यासाठी खेळ सुद्धा खेळावेत, सामान्य ज्ञान वाढवावे, दिखाऊ पेक्षा टिकाऊ वृत्ती जोपासावी असा विद्यार्थ्यांना सल्ला देऊन आदित्य अकॅडमी ने गुणवत्ता व दर्जात्मक शिक्षण दिल्याने यशाचा आलेख उंचावत असून आदित्य अकॅडमी चे यश कौतुकास्पद असल्याचे मा.शर्मिला पवार यांनी सांगितले
सर्व सामान्य परिस्थिती असताना जिद्द चिकाटी च्या जोरावर आदित्य अकॅडमी च्या माध्यमातून प्रा. सुजित वाबळे यांनी मिळवलेले यश आदर्शवत असल्याचे बारामती सह. बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी सांगितले.
या वेळी इयत्ता 8, 9, 10, 11 व 12 मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला स्वागत प्रा सुजित सर यांनी केले प्रास्ताविक प्रा.सुप्रिया मॅडम सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील तर आभार प्राचार्य चैत्राली मॅडम यांनी केले.