व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र महिला आघाडी राज्याध्यक्षपदी ह. भ. प. मीराताई रणवरे


दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । युवकमित्र ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्या महिला आघाडी राज्याध्यक्षपदी ह. भ. प. मीराताई रणवरे यांची तोरणा गड, वेल्हा येथे झालेल्या राज्यस्तरीय युवक/युवती संस्कार सोहळ्यामध्ये सर्वानुमते निवड करण्यात आली.

ह. भ. प. मीराताई रणवरे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्याख्यान, प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार व प्रसार करत आहेत. चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब (भरत शिंदे) यांच्या त्या भगिनी असून मृदंगाचार्य ह. भ. प. निलेश महाराज रणवरे, निंभोरे ता. फलटण यांच्या त्या पत्नी आहेत. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.


Back to top button
Don`t copy text!