
दैनिक स्थैर्य | दि. १४ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
जल जीवन मिशनअंतर्गत पंचायत समिती फलटण यांच्या वतीने व्यसनमुक्ती अभियान व लेक वाचवा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात रोहीत कदम यांनी व्यसनाचेे होणारे दुष्परिणाम, बिघडणारे सामाजिक वातावरण, आर्थिक समस्या, बेरोजगारी, गरिबी इ. समस्या निर्माण होतात, असे सांगितले. व्यसनमुक्ती करण्यासाठी शाळा, ग्रामपंचायती यांचा समन्वय साधून समाजपरिवर्तन करणे, ही काळाची गरज असल्याचेही ते म्हणाले.
एम के. इंदापुरे यांनी लेक वाचवा अभियानांतर्गत ‘पणती जळो सारी रात्र’ हा एकपात्री प्रयोग सादर करून मुलींचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमास जलजीवन मिशन कोल्हापूर विभागाचे गुरव, फलटण विभागाचे संदीप शिंदे, ग्रामपंचायत सेवक वर्ग, अंगणवाडी मदतनीस, सेविका, आशा प्रवर्तक उपस्थित होत्या.