
स्थैर्य, फलटण, दि. १२ : तुषार नाईक निंबाळकर यांनी आदित्य असोसिएटच्या माध्यमातून फलटण व परिसराच्या वैभवात भर घातली आहे. निश्चितच ही परंपरा अखंडितपणे सुरु राहील, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
तुषार नाईक निंबाळकर यांच्या आदित्य असोसिएटच्या स्वरा हाईट्स (रिंगरोड) येथील कार्यालयाचे उदघाटन बुधवार (दि.०३) रोजी सकाळी १० वाजता सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
दरम्यान, आदित्य असोसिएटच्या नूतन कार्यालयात श्रीमंत संजीवराजे यांचा यथोचित सत्कार तुषार नाईक निंबाळकर व कुटुंबीयांनी केला.