आदर्कीत साखरेचा ट्रक पल्टी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । सातारा । कापशी ता. फलटण येथील शरयू साखर कारखान्याचा ट्रक हा कारखान्यातून साखर भरून सातारकडे जात होता. दरम्यान, आदर्कि गावाबाहेरील माळवाडा बसथांबा व कड्यातील पुलाच्या वळणावर ट्रकचालकास वळणावरील रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक जागेवरच पलटी झाला. यामध्ये सुदैवाने जीवित हानी कोणतीही झाली नाही. ही घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान घडली.

याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, शरयू कारखाना येथून साखरेने भरलेला ट्रक क्रमांक एम एच ११ के पी ८२२२ हा आदर्कि गांवच्या बाहेरील माळवाडा एसटी बस थांबा येथील एक वळण घेत असताना पलटी झाला. यावेळी या ट्रकमधील साखरेची पोती क्षणातच विखुरली गेली. या घटनेनंतर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. या वळणावर आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. या महिन्यात याच वळणावर ट्रक पलटी होण्याची ही दुसरी घटना आहे. याचा विचार करता सार्वजनिक विभागाने येथील रस्ता दर्जेदार करण्याबरोबरच हे तीव्र वळण कमी करावे अन भविष्यातील अपघाताच्या घटना टाळाव्यात अशी मागणी वाहनधारक, ग्रामस्थामधून होत आहे.


Back to top button
Don`t copy text!