दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण व सेवासदन लाईफ लाईन हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त सहभागाने सोमवार दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत एक दिवसीय मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन श्री भैरवनाथ पतसंस्था सांस्कृतिक भवन, आदर्की बु||, ता. फलटण येथे करण्यात येत असल्याची माहिती श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांनी दिली आहे.
एक दिवसीय मोफत सर्व रोग निदान शिबीरामध्ये संपूर्ण शरीराची तपासणी मोफत करण्यात येणार आहे. अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत ई. सी. जी. काढला जाणार आहे, ह्रदयविकार, मेंदु विकार, मोतीबिदु, बायपास शस्त्रक्रिया, मधुमेह, अंजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, फिट, पॅरालिसिस, डोकेदुखी, चक्कर, स्नायुचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्ताशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या व इतर तपासणी करुन शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
रुग्णांची तपासणी करुन ज्या रुग्णांवर उपचार व शस्त्रक्रिया करावयाची आहे त्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारकांसाठी मोफत उपचार केले जाणार आहेत.
नेत्र तज्ञांमार्फत नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करुन नंबर सह चष्मा मोफत दिला जाणार आहे. बिनटाका मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया (फेको फोल्डेबल) व अल्पदरात होणार आहे.
० ते १२ वयोगटातील लहान मुलांच्या सर्व नेत्र शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत हे या शिबीराचे खास वैशिष्ट्य असल्याचे बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांनी सांगितले. एक दिवसीय मोफत सर्वरोग निदान शिबीरात सहभागी होणेसाठी श्री भैरवनाथ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., फलटण शाखा आदर्की बु|| येथे मोबाईल क्रमांक ९७६६६३३५५५ व मोबाईल क्रमांक ९७६६६३३५३५ वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.