टीव्ही सेटवर कोरोना : अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन; ‘अग्गबाई सासूबाई’च्या सेटवरील इतर कलाकारांची टेस्ट निगेटिव्ह


 

स्थैर्य, दि.२३: छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या अग्गबाई सासूबाई या मालिकेत मुख्य व्यक्तिरेखा साकारणा-या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांना सौम्य लक्षणे असून त्यांनी स्वतःला घरीच क्वारंटाइन केल्याचे समजते.

मालिकेत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारे तेजश्री प्रधान, आशुतोष पत्की, डॉ. गिरीश ओक यांच्यासह इतर कलाकारांची कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मालिकेच्या सेटवर सर्वांच्या सुरक्षेची योग्यरित्या काळजी घेतली जात असल्याचे मालिकेच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!