‘चलते चलते’ चित्रपटातील अभिनेते विशाल आनंद यांचे निधन, दीर्घ काळापासून होते आजारी


 

स्थैर्य, दि.५: बॉलिवूड अभिनेते विशाल आनंद यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 4 ऑक्टोबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे खरे नाव भीष्म कोहली आहे. त्यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास 11 चित्रपटांमध्ये भूमिका वठवल्या. तर काही चित्रपटांचे ते निर्माते आणि दिग्दर्शकसुद्धा होते.

‘चलते चलते’, ‘सारे गामा’, ‘दिल से मिले दिल’ आणि ‘टॅक्सी ड्राइव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता पुरब कोहली हा त्यांचा पुतण्या आहे.

‘चलते चलते’ या चित्रपटांत त्यांनी सीमी गरेवालसोबत काम केले होते.या चित्रपटाचे ते निर्मातेदेखील होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!