अभिनेता सोनू सूद आणि मंत्री अस्लम शेख मातोश्रीवर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. 08 : अभिनेता सोनू सूद याने रविवारी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्याच्यासोबत मंत्री अस्लम शेख होते. दरम्यान, या भेटीनंतर साेनू याने माध्यमांशी बोलताना आमच्यात काहीही गैरसमज नसल्याचे सांगितले. त्यामुळे या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

सोनू याने लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मदत केली होती. सेना नेते संजय राऊत यांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला होता. सेनेकडून या भेटीवर काहीही प्रतिक्रिया आली नाही.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सोनू सूद हा मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आजच सोनू सूदवर टीका करण्यात आली होती. यानंतर लगेचच सोनू सूद मातोश्रीवर गेला. सोनू सूद याच्याबरोबर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील होते.

दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याआधी सोनू सूद याने मराठीमध्ये ट्विट केलं. ‘स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे.स्थलांतरीत मजूरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,’ असं सोनू त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला.

कोरोना लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनू सूदने आर्थिक मदत केली. यावरून संजय राऊत यांनी सोनू सूदवर निशाणा साधला. सोनू सूदला दत्तक घेऊन भाजपकडून उत्तर भारतीय व्होटबँकेचं राजकारण सुरू असल्याची टीका संजय राऊत यांनी सामनामधून केली. यानंतर सोनू सूदच्या बचावासाठी भाजपने पुढाकार घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!