अभिनेता मनोज वाजपेयीला कोरोनाची लागण


स्थैर्य,मुंबई दि. १२: कोरोना विषाणूचं  संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी  याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने घरातच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मनोज आणि त्याच्या कुटुंबीयांना सध्या घरातच क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे. माझी तब्येत स्थिर कोणीही काळजी करु नये अशी विनंती त्यानं आपल्या चाहत्यांना केली आहे. शिवाय कोरोनापासून सावध राहा, घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्या. असा सल्ला त्यानं चाहत्यांना दिला आहे.

 


Back to top button
Don`t copy text!