‘आपली फलटण मॅरेथॉन २०२४-२५’ ला अभिनेते महेश मांजरेकर उपस्थित राहणार


दैनिक स्थैर्य | दि. २३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
‘आपली फलटण मॅरेथॉन २०२४-२५’ ५ जानेवारी २०२५ रोजी होणार आहे. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक, चित्रपट निर्माता आणि ‘बिग बॉस’ फेम महेश मांजरेकर श्रोत्यांना संबोधित करण्यासाठी आणि विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मॅरेथॉनचे आयोजक फलटण रोबोटिक्स सेंटर, जोशी हॉस्पिटल प्रा.लि.कडून देण्यात आली आहे. या ‘आपली फलटण मॅरॅथॉन २०२४-२५’ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मॅरेथॉनमध्ये सहभागासाठी नोंदणीची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४ आहे, अशी माहिती फलटण रोबोटिक्स सेंटर, जोशी हॉस्पिटल प्रा. लि. फलटण यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!