बरड बागेवाडी येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश


दैनिक स्थैर्य | दि. १ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
बरड-बागेवाडी (ता. फलटण) येथील पोपटराव वाघमोडे (तात्या), सुभाषराव वाघमोडे, दिलीपराव वाघमोडे, रोहितशेठ वाघमोडे, सागरशेठ वाघमोडे व बागेवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांनी व सोमंथळी येथील दडस कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), आमदार श्री. दीपक चव्हाण व श्री. सह्याद्रीभैया चिमणराव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेगटात सामील झालेल्या बरड बागेवाडी येथील कार्यकर्त्यांमुळे राजे गटाला या भागात अधिक मजबुती मिळाली आहे.


Back to top button
Don`t copy text!