सस्तेवाडी येथे दोन सख्ख्या भावांच्या हातभट्टी दारू अड्ड्यांवर कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
सस्तेवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीत दातेवस्ती येथील कांबळेश्वर रोडवरील नवीन पुलाच्या जवळ उघड्यावर बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूअड्डा चालविणार्‍या दोघा सख्ख्या भावांवर पोलिसांनी कारवाई करीत हा दारूअड्डा उद्ध्वस्त केला आहे. यावेळी पोलिसांनी ६७५०/- रुपये किमतीची चार काळे रंगात ३५ लिटरच्या हत्ती कॅन साठवलेली हातभट्टी दारू जप्त केली आहे.

ही कारवाई २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आली आहे. या प्रकरणी संजय श्याम पवार (वय ३५, राहणार सोमवार पेठ, तालुका फलटण) याच्यावर बेकायदेशीर बिगर परवाना दारूची चोरटी विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दुसर्‍या कारवाईत वरील आरोपीचाच सख्खा भाऊ त्याच ठिकाणी चालवित असलेल्या दुसर्‍या हातभट्टी दारूअड्ड्यावर पोलिसांनी कारवाईत करीत ३२५०/- रुपये किमतीची दोन काळ्या रंगाच्या ३५ लिटरच्या हत्ती कॅनमध्ये विक्रीसाठी ठेवलेली गावठी हातभट्टी दारू जप्त केली.

यावेळी हा दारूअड्डा चालविणारा अर्जुन श्याम पवार (वय ३०, सोमवार पेठ, तालुका फलटण) याच्यावर फलटण शहर पोलिसांनी बेकायेदीशर देशी दारू विक्री केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास फलटण शहर पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!