११.१९ कोटींच्या करचोरी प्रकरणी एकास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ जून २०२२ । मुंबई । 50.88 कोटींची खरेदी दाखवून 11.19 कोटी रुपयांची चुकीची कर वजावट दाखवून शासनाचा महसूल बुडविल्याप्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कार्यवाही करुन मे. जातवेदास कंस्ट्रक्शन कंपनी प्रा. लि. कंपनीचे संचालक हितेश अमृतलाल पटेल, (42), घाटकोपर यांना मंगळवार दि. 14 रोजी अटक केली.  अन्य दोन संचालक अशोक मेवाणी व नरेंद्र पटेल यांचा शोध सुरु आहे, अशी माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

महानगर दंडाधिकारी यांनी हितेश पटेल यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर, संजय सावंत, सहायक राज्यकर आयुक्त संजय शेटे, नामदेव मानकर सहभागी झाले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 19 जणांना अटक केली आहे.


Back to top button
Don`t copy text!