दुचाकी चोरट्यास गजाआड डीबीच्या पथकाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ मे २०२२ । सातारा । सातारा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. हे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, सहा. पो. अधिक्षक आँचल दलाल, वरिष्ठ पो.नि. भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीच्या पथकाने कारवाई केली. यावेळी मोटारसायकल चोरी प्रकरणी अभिजीत राजाराम लोहार वय ३४ रा. आंबवडे बुद्रुक ता. जि. सातारा सध्या रा. मंगळवार पेठ सातारा या अट्टल चोरट्यास अटक करण्यात आली.

यावेळी त्याच्याकडून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. सातारा शहरात दुचाकी चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे डी.बीच्या पथकाने कारवाई करत असताना स्थानिक बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार एक सराईत मोटारसायकल चोरट्याची माहिती मिळताच डीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेउन चौकशी केली असता दि. ९ मे रोजी सातारा एसटी स्टॅण्ड परिसरातून एक हिरो होंडा पॅशन मोटारसायकल चोरी केल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने अन्य ठिकाणाहून आणखी दोन दुचाकीची चोरी केल्याचे सांगितले. त्याही पोलिसांनी जप्त केल्या. त्याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे. या चोरट्यांनी यापूर्वीही असे अनेक गुन्हे केले असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे.

या कारवाईत पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, अप्पर पोलिस अधिक्षक अजय बोऱ्हाडे, सहा. पोलिस अधिक्षक आंचल दलाल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर, सपोनि वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पो.उप. सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, पो. ना. विक्रम माने, पो.कॉ. संतोष कचरे, गणेश घाडगे, विशाल धुमाळ, गणेश भोंग, सागर गायकवाड आदींनी सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!