बेकायदेशीपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर कारवाई : तीन लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. १३: पुसेसावळी (ता. खटाव) येथून बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक करणार्‍या गाडीवर सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत 3 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि. 10 एप्रिल 2021 रोजी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम पुसेसावळी (ता. खटाव) येथे त्याच्या राहत्या घरी मारुती सुझुकी इको गाडी क्र. (एमएच 12 जीआर 5059) मधून गुटख्याची पोती घेऊन विक्रीकरिता आणणार आहे, अशी बातमी मिळाल्याने, बातमीची खात्री करून कारवाई करण्याकामी पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सपोनि रमेश गर्जे व पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सपोनि रमेश गर्जे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक बातमीच्या ठिकाणी त्रिमूर्ती चौक, पुसेसावळी (ता. खटाव) थांबले असताना दि. 10 एप्रिल 2021 रोजी रात्री 11.45च्या सुमारास एक इसम मारुती सुझुकी इको गाडी क्र. (एमएच 12 जीआर 5059) ही घेऊन आला. त्यास थांबवून त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात विमल पान मसाल्याची एकूण 2 पोती, त्यामध्ये विमल पान मसाल्याची अंदाजे 400 पाकिटे, ए-1 सुगंधी तंबाखूची एकूण 8 पोती, त्यामध्ये ए-1 सुगंधी तंबाखूची अंदाजे 400 पाकिटे व मारुती सुझुकी इको गाडी क्र. (एमएच 12 जीआर 5059) असा एकूण 3, 91, 200 रुपयांचा माल मिळून आला.

सदरचा माल (गुटखा) महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री करण्यास बंदी असल्याने त्याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन कार्यालय सातारा यांना रिपोर्ट देण्यात आला असून औंध पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, सहा. फौजदार जोतिराम बर्गे, पो. हवा. कांतीलाल नवधणे, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, नीलेश काटकर, अमित सपकाळ, पो. कॉ. रोहित निकम, विशाल पवार, विक्रम पिसाळ, मोहसिन मोमीन, पंकज बेसके यांनी केली.


Back to top button
Don`t copy text!