गुणवरे येथे जुगार खेळताना सहाजणांवर कारवाई


दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
गुणवरे (ता. फलटण) गावच्या हद्दीत हार्‍याचा मळा नावाच्या शिवारात ओढ्याच्या कडेला चिंचेचा झाडाखाली तीन पानी जुगार खेळताना रविवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सहाजणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ हजार २० रूपयांची रोख रक्कम पत्त्याची पाने असे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंकज प्रकाश जाधव, सुनील ज्ञानदेव भोसले, बापू निवृत्ती जाधव, राजेंद्र शिवाजी जाधव, भगवान उत्तम बंडलकर, सुधीर जयराम आढाव (सर्व रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) अशी जुगार खेळणारांची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक तपास पो.हवा. साबळे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!