
स्थैर्य, सातारा, दि. १४: अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही कापड दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सिटी सेंटर या कापड दुकानाचे मालक मोहित कटारिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत माहिती अशी, सातारा जिल्ह्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन व इतर दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र, 13 एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दुकान सुरू ठेवले होते. हा प्रकार निदर्शनास येताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार राजाराम निकम यांनी कारवाई करून दुकानाचे मालक मोहित कटारिया यांच्यावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी हवालदार गाढवे तपास करत आहेत.