साताऱ्यातील कॅफेधारकांवर कारवाई सातारा पालिकेची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ एप्रिल २०२२ । सातारा । मुख्य ठिकाणी एकूण १३ अनधिकृत बांधकामे करण्यात आली त्यानंतर सोयीनुसार त्यात बदल केले आहेत. यामध्ये राजरोसपणे कॅफे सुरु आहेत. या कॅफेमध्ये महाविद्यालयीन युवक-युवतींना बसण्यासाठी स्वायत्तता देण्यात आली आहे. याबाबत सातारा नगरपालिका किंवा पोलिस स्टेशनची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने मंगळवार, बुधवार या दोन दिवशी १३ अनधिकृत कॅफेवर कारवाई करण्या आली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, १५ दिवसांपूर्वी पालिकेने नोटीसा बजावूनही पुढील तीन दिवसांत कोणत्याही कागदपत्रांची पुर्तता न केल्याने संबंधित कॅफेवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये कॅफे, पॅराडाईज, स्वीटकपल, लव्ह ॲन्ड लाटे, विराज, रेड रोज, क्युपीड, ईस्ट वेस्ट, व्हॅलेटाईन, ब्लॅक इन, द हीडन, फ्रेन्डस फॉरएव्हर, हार्ट बीट फ्रेन्डस या १३ कॅफे चालक मालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने नगरपालिका अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.

सातारा शहरात सुरु असलेले ही कॉफी कॅफे पालिकेची कोणतीही आवश्यक परवानगी घेतलेलीच नाही. ही बाब निदर्शनास येताच १५ दिवसांपूर्वी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुढील तीन दिवसांत संबंधित कॅफे चालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे असतानाही सादर केली नसल्याने ही कारवाई केली. त्यावेळी तिथे मुल-मुली दिसून आल्या. येथील गाळ्यामध्ये बांधकामात केलेले बदल अन प्रथमदर्शनी दिसणारी व्यवस्था ही अचंबीत करणारीच होती. या कारवाईत भाग निरिक्षक श्रीकांत गोडसे, प्रकाश शिर्के, सतिश साखरे, अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रशांत निकम व अतिक्रमण विभागाचे पथक तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलिस राहूल खाडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!