दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा । सेवा पंधरवडा निमित्त अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र आणि इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती व शालांतपुर्व (मॅट्रीकपूर्व) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रलंबित अर्जाबाबत कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी केले आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून वैयक्तिक लाभाची योजना विचारात घेता इ. 1 ली ते 10 वी पर्यंत असलेल्या अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र आणि इतर मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी मॅट्रीक पुर्वशिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती आणि शालांत पुर्व (मॅट्रीकपूर्व) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती या योजने संदर्भात सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामधील शाळास्तरावरून तांत्रिक अडचणींमुळे कागदपत्रे अपूर्ण असल्याने विदयार्थ्याचे प्रलंबित असणारे प्रस्ताव विलंबाच्या कारणासहित संबंधित शाळांनी गट शिक्षण अधिकारी यांचेमार्फत विहीत नमुन्यामध्ये हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपीमध्ये आवश्यक त्या कागदपत्रांसह शाळांकडून ऑफलाईन पध्दतीने कार्यालयीन वेळेत वरील कालावधीत संबंधित पंचायत समितीमध्ये जमा करावेत.
सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त विदयार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याकरिता सर्व सामान्य शाळा/ दिव्यांगाच्या विशेष शाळा यांनी विहीत कार्यवाही त्वरीत करावी, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी केले आहे.